Ad will apear here
Next
रवींद्रनाथ टागोरांच्या नोबेलला १०७ वर्षे


बंगाली साहित्य आणि संगीत आणि एकंदरीतच भारतीय कलांना नवा आकार देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. त्यांच्या ‘गीतांजली’ या रचनेला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाल्याच्या घटनेला १० डिसेंबर २०२० रोजी १०७ वर्षे पूर्ण झाली. १० डिसेंबर १९१३ रोजी त्यांना हे पारितोषिक देण्यात आले होते. नोबेल पारितोषिक मिळवणारे टागोर हे युरोपबाहेरचे पहिलेच व्यक्तिमत्त्व होते. रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य आणि बंगाली भाषा यावर निरतिशय प्रेम करणारे मराठी साहित्यिक म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांची जन्मशताब्दी गेल्या वर्षी झाली. ‘पुलं’च्या टागोरांवरील प्रेमाची अनुभूती देणारे सादरीकरण येथे देत आहोत. 

‘शब्दवेध, पुणे’ निर्मित ‘अपरिचित पुलं’ हा कार्यक्रम रत्नागिरीत पुलोत्सवा’त सादर झाला होता. हे सादरीकरण त्या कार्यक्रमातीलच आहे. या कार्यक्रमाचे संकलन चंद्रकांत काळे यांनी केले होते. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, ज्येष्ठ अभिनेते-गायक चंद्रकांत काळे आणि अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी या कार्यक्रमात ‘पुलं’च्या अपरिचित साहित्याचे बहारदार अभिवाचन केले. 

‘विझे दिवसाचा दिवा, सूर्य बुडाला बुडाला, 
मेघ आकाशी जमले, लोभ चंद्राशी जडला’

ही रवींद्रनाथ टागोर यांची ‘पुलं’नी मराठीत अनुवादित केलेली कविता या कार्यक्रमात गिरीश कुलकर्णी यांनी सादर केली. तसेच, ‘शांतिनिकेतनमधला शेवटचा दिवस’ हा ‘पुलं’चा लेख चंद्रकांत काळे यांनी सादर केला. 

(पुलं म्हणजे मराठीतले टागोर, असं मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केलं होतं. त्यांची मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZTYCH
Similar Posts
‘पुलं’ची शब्दकळा समाजजीवनाचे मर्म टिपणारी रत्नागिरी : ‘पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या लेखनात समाजजीवनाचे मर्म टिपले आणि नुसते सांगण्यापेक्षा काही तरी करून सांगावे अशी त्यांची शब्दकळा होती. ‘परफॉर्मन्स स्किल’ हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव होता. तो मला भावला. त्यांच्या अशा वैशिष्ट्यपूर्ण शब्दकळेमुळेच ज्यांना त्यांच्या आवाजाची सवय आहे, त्यांना
‘पुलसुनीत’ ठरणार दातृत्वामधील दुवा रत्नागिरी : पु. ल. देशपांडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्याला माहिती आहेत. लेखनासह विविध कलांच्या त्यांनी केलेल्या आविष्काराचा आनंद आपण कोणत्या ना कोणत्या रूपात लुटत असतो. त्या पलीकडेही दातृत्व हा त्यांच्या जीवनाचा एक मोठा पैलू होता. समाजात तो पैलू वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने ‘पुलं’च्या जन्मशताब्दीनिमित्ताने
कवितेवर ज्यांचं प्रेम नाही, तो कसलाच कलावंत होऊ शकणार नाही : पु. ल. देशपांडे बहुपैलू व्यक्तिमत्त्व असलेले महाराष्ट्राचे लाडके लेखक पु. ल. देशपांडे यांचा १२ जून हा स्मृतिदिन. मॅजेस्टिक बुक स्टॉलतर्फे प्रकाशित झालेल्या ‘पु. ल. : एक साठवण’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ १८ नोव्हेंबर १९७९ रोजी मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात झाला होता. त्या समारंभात ‘पुलं’नी केलेल्या भाषणातील काही अंश ‘पुलं’च्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाशित करत आहोत
.. आणि संगमेश्वरी बोलीतील विनोदांनी ‘पुलं’ झाले हास्यरसात चिंब! पुस्तकांपलीकडचे पुलं अनुभवण्याची, न्याहाळण्याची अल्प संधी मला देवरुखमुळे मिळाली. ‘पुलं’चे सुहृद कै. अरुण आठल्ये यांच्यामुळे! अरुण आठल्येंशी असलेल्या कौटुंबिक जिव्हाळ्यामुळे ते देवरुखला आठल्येंच्या ‘अजॉय’ बंगल्यावर मुक्कामाला असताना उत्तररात्रीपर्यंत रंगलेली गप्पांची (साधारण १९७३-७४ दरम्यान झालेली) एक बहारदार मैफल अजूनही मला टवटवीतपणे आठवते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language